अब्राहम लिंकन चे हेडमास्तरास पत्र

अब्राहम लिंकन चे हेडमास्तरास पत्र

प्रिय गुरुजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी, मात्र त्याला हे देखील शिकवा – जगात प्रत्येक बद्नावागानिक असतो एक साधुचरीत पुरुषोत्तम ही. स्वार्थी राजकरणी असतात जगात तसे असतात अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.

मला माहित आहे, सगळ्या गोष्टी लवकर नाही शिकवता येत, तरीही जमल तर त्याच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.

हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमान घ्यायला. तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा. शिकवा त्याला हर्ष संयमान व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवण सर्वात सोपी असत!

जमेल तेवढे दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराच अदभुत वैभव, मात्र त्याच बरोबर, मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीच शाश्वत सौदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मानभरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगरउतारावर डुलणारी चिमुकली फुलं.

शाळेत त्याला हा धडा मिळू दे – फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश शेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं, बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवले तरी.

त्याला सांगा, त्यानं भल्यांशी भलाईन वागावं आणि ठग्यांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी.

पुढे त्याला हेही सांगा त्याला ऐकावं जगाचं, अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढ स्वीकारावं.

जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा, हसत रहावं उरातलं दुख दाबून. आणि म्हणावं त्याला, आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको. त्याला शिकवा तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला अन चाटुगिरीपासून सावध रहायला.

त्याला हे पुरेपूर समजावा की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा! धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय्य वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.

त्याला ममतेन वागवा पण त्याला लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बाणवा अधीर ह्वायचा धैर्य, अन धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य.

आणखीही एक सांगत रहा त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर.

माफ करा गुरुजी! मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे. पण पहा जमेल तेवढ अवश्य कराच. माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे हो तो.

– अब्राहम लिंकन

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Archives

%d bloggers like this: