सुखकर्ता दु:खहर्ता आरती चा अर्थ

आपल्या लाडक्या गणेशाच्या आरती चा अर्थ खाली दिला आहे.

आरती चा अर्थ समजुन ती म्हणल्यावर अजुन चांगला देवाप्रती भाव चांगला होतो. आणि हा अर्थ गणपती बसायच्या आत किवा बसल्यावर सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करा.

सुखकर्ता दु:खहर्ता :- सुख देणारा दुःख हरण करणारा

नुरवी :- दुःखाचा समुळ नाश करतो

पुरवी प्रेम कृपा जयाची :- त्याची कृपा झाली की प्रेमवर्षावा भक्ताला लाभ होतो

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची :- गणेश सर्वांगाने सुंदर आहे. त्याने शेंदुराची उटी लावली आहे।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची।।१।। :- त्याच्या कंठात मोत्याची माळ झळाळत आहे।।१।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मन: कामना पुरती।।धृ।। :- हे देवा, तुझा जयजयकार असो। तु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस। तुझ्या केवळ दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात।।धृ।।

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। :- हे गौरीकुमारा रत्न जडवलेला मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे।

चंदनाची उटी कुमकुमकेशरा। :- कुंकू आणि केशर मिश्रित चंदनाची उटी तु लावली आहे।

हिरेजडित मुकुट शोभतो बरा। :- हि-यांनी जडलेला मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसत आहे.

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया।।२।। :- तुझ्या पायांतील वाळ्यांतील घूंगरांचा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे।।२।।

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना। :- मोठे पोट असणा-या, पीतांबर नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला.

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना। :- सरळ सोंड व वाकडे तोंड असणा-या, म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुन त्यांना सरळ मार्गावर आणणा-या, त्रिनयना (३ नेत्र असणा-या)।

दास रामाचा वाट पाहे सदना। :- हे गणपते मी रामाचा दास (समर्थ रामदास स्वामी) माझ्या घरी मी तुझी आतुरतेने वाट पहात आहे।

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना।।३।। :- हे सुरवरवंदना – सर्वश्रेष्ठ देवांकडून वंदिल्या जाणा-या हे गजानना, सर्व संकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर।

निर्वाणी – अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी तु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना।

-समर्थ रामदास स्वामी.
(संदर्भ:- आरतीसंग्रह अर्थासह सनातन लघुग्रंथ)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Atul Palandurkar

%d bloggers like this: