निर्णय चुकतात आयुष्यातले

निर्णय चुकतात आयुष्यातले

आणि

आयुष्य चुकत जाते..

प्रश्न कधी-कधी कळत नाहीत

आणि उत्तर चुकत जाते..

सोडवताना वाटतं

सुटत गेला गुंता..

पण प्रत्येक वेळी नवनवीन

गाठ बनत जाते

दाखविणाऱ्याला वाट

माहित नसते..

चालणाऱ्याचे ध्येय मात्र

हरवून जाते..

दिसतात तितक्या सोप्या

नसतात काही गोष्टी..

“अनुभव”

म्हणजे काय हे तेव्हाच कळते…

असे मित्र बनवा

जे कधीच साथ सोडणार नाही..

असे प्रेम करा

ज्यात स्वार्थ असणार नाही..

असे हृद्य बनवा कि

ज्याला तडा जाणार नाही..

असे हास्य बनवा

ज्यात रहस्य असणार नाही..

असा स्पर्श करा

ज्याने जखम होणार नाही..

असे नाते बनवा

ज्याला कधीच मरण नाही…

आयुष्य छान आहे,

थोडे लहान आहे……

रडतोस काय वेड्या.?

लढण्यात शान आहे…

काट्यातही फुलांची झुलती

कमान आहे…..

उचलून घे हवे ते,

दुनिया दुकान आहे….

जगणे निरर्थक म्हणतो तो

बेइमान आहे.

“सुखासाठी कधी हसावं लागंत

तर कधी रडावं लागतं,

कारण सुंदर धबधबा बनायला

पाण्यालाही उंचावरुनपडावं लागतं”…

सुरेश भट

जगातलं सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे

“जगातलं सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे *जबाबदारी…!*

एकदा घेतलं की माणूस वाट चुकत नाही,

आयुष्यभर थकत नाही आणि आपले कर्तव्य चुकत नाही.”

आपण का पडतो?

आपण का पडतो?
परत उठून उभे राहण्यासाठी.

आपण का अयशस्वी होतो?

परत यशस्वी होण्यासाठी.

कपडे झाले छोटे

👗 कपडे झाले छोटे,
🙈 लाज कुठुन येणार,
🌾 धान्य झाले हाईब्रेड,
💪 ताकद कुठुन येणार,
🌸 फुल झाली प्लास्टिकची,
😌 सुगंध कुठून येणार,
👩 चेहरा झाला मेक अपचा,
👸 रुप कुठून येणार,
👨 शिक्षक झाले टुयशनचे,
📚 विद्या कुठुन येणार,
🍱 भोजन झाले हाँटेलचे,
✊ तंदुरुस्ती कुठून येणार,
👻 प्रोग्राम झाले केबलचे,
😇 संस्कार कुठून येणार,
💴 माणसे झाली पैशाची,
🙏 दया कुठुन येणार,
🏭 धंदे झाले हायफाय,
🏢 बरकत कुठुन येणार,
😋 भक्ति करणारे झाले स्वार्थी,
👤 भगवंत कुठून येणार,
👫 मित्र झाले वॉट्सअपचे,
💃🏃 भेटायला कुठून येणार

जिथे दान देण्याची सवय असते

जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते…..

डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत……

“मी दुनिये बरोबर लढ़ु शकतो पण आपल्या माणसांबरोबर नाही कारण आपल्या माणसांबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही तर ‘जगायचे’ आहे”.

चांगले करेल

मी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
पण
मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……!

काय जिंदगी आहे?

काय जिंदगी आहे?
डॉक्टर ला वाटते तुम्ही आजारी पडावे.
पोलिसाला वाटते तुम्ही काही तरी गुन्हा करावा.
वकीलाला वाटते तुम्ही कुठेतरी कधीतरी कसतरी कायद्याच्या कचाट्यात अडकाव.
एका इंजीनियर ला वाटत तुम्ही कर्ज काढून का होईना पण घर बांधाव.
अंतयात्रेचे सामान विकणार्याला वाटते तुम्ही मरावे.

फक्त आणि फक्त

एका  “शिक्षकाला वाटत तुम्ही जीवनात यशस्वी व्हावे व सुंदर जीवन जगावे

चहा की कॉफी

चहा…!  की  कॉफी…!!

चहा म्हणजे उत्साह..,
कॉफी म्हणजे स्टाईल..!

चहा म्हणजे मैत्री..,
कॉफी म्हणजे प्रेम..!!

चहा एकदम झटपट..,
कॉफी अक्षरशः निवांत…!

चहा म्हणजे झकास..,
कॉफी म्हणजे वाह मस्त…!!

चहा म्हणजे कथासंग्रह…,
कॉफी म्हणजे कादंबरी…!

चहा नेहमी मंद दुपार नंतर…,
कॉफी एक धुंद संध्याकाळी…!!

चहा चिंब भिजल्यावर…,
कॉफी ढग दाटुन आल्यावर…!

चहा = discussion..,
कॉफी = conversation…!!

चहा = living room….,
कॉफी = waiting room…!

चहा म्हणजे उस्फूर्तता…,
कॉफी म्हणजे उत्कटता…!!

चहा = धडपडीचे दिवस…,
कॉफी = धडधडीचे दिवस!…!

चहा वर्तमानात दमल्यावर…,
कॉफी भूतकाळात रमल्यावर…!!

चहा पिताना भविष्य रंगवायचे…,
कॉफी पिताना स्वप्न रंगवायची…!!!

वाघ जखमी झाला तरी

खूप  सुन्दर ओळ

वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही…. तो थांबतो,
वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो….. घेऊन,  तीच दहशत…..अन तोच दरारा!!!

पराभवाने माणुस संपत नाही.,
प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
की “शर्यत अजुन संपली नाही, कारण, मी अजुन जिंकलेलो नाही…”

कोणत्याही अपेक्षे शिवाय

कोणत्याही अपेक्षे शिवाय कोणाचेही
चांगले करण्याचा प्रयत्न करावा….
कारण एक जुनी म्हण आहे
“जे लोक नेहमी फुले वाटतात,
त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो”…

आई ला विसरु नका तुम्ही…

जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका…….
       
     जेव्हा मागत होते फुगा
     लहानपणी आई जवळ
    आता आई चष्मा मागते
    तर तिला नाही म्हणु नका तुम्ही….

जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही….
      

     आई रागवत होती तुम्हाला
     जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
     आता तिला ऐकु येत नाही
     तर तिला रागावु नका तुम्ही….

जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही….
         

         जेव्हा रडत होते तुम्ही
         आई छातीला लावत होती
         आता सहन करा दु:ख तुम्ही
          तिला रडु देवु नका तुम्ही….

जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही…..

एक शेअर आईसाठी.

आयुष्य खुप सुंदर आहे

एका शिक्षिकेने अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात धरला आणि सर्व विद्यार्थ्यांवर एक नजर टाकली.

प्रत्येकाला वाटले की आता मॅडम विचारतील की हा ग्लास भरलेला आहे की रिकामा?. पण एक स्मित हास्य करुन मॅडम ने प्रश्न केला, “या ग्लासचं वजन किती असेल कुणी सांगेल का?”

कुणी म्हणालं 100 ग्रॅम तर कुणी 200 ग्रॅम. एक जण तर म्हणाला – मॅडम, अर्धा किलो !

मॅडम ने पुन्हा एकदा स्मित हास्य करुन बोलण्यास सुरुवात केली,” याचं वजन मोजमाप करुन सांगितल्याने फारसा फरक पडणार नाही! मुळात वजन काहिही असो, जर का मी हा ग्लास एक मिनीट असाच धरुन ठेवला तरमला काही त्रास होणारनाही. एक तास धरुन ठेवला तर हात दुखेल. आणि दिवस भरअसाच ठेवला तर? तर हात खुप जड होईल, ईतका की बधीर होउन निकामीच ह्वावा.

आपल्या आयुष्यातील तणाव अन् चिंतांच पण असंच असतं. क्षण भर विचार करा, काही वाटणार नाही. पण मनात धरुन बसाल तर तुमचं मन पण असंच जड होत होत बधिर होईल! ईतकं की तुम्ही काही करुच शकणार नाहीत! तेव्हा व्यर्थ चिंता करणं सोडा. मनाला हलकं करा आणि निरंतर अल्हाद दायक जिवन जगायला शिका.

…आयुष्य खुप सुंदर आहे…ते अजुन सुंदर बनवा…

सुंदर दिवसाची सुंदर सुरवात

सुंदर दिवसाची सुंदर सुरवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्‍याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.

स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं

स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेण सोडल की प्रेम संपत!
म्हणुन, स्वप्न पाहा,विश्वास ठेवा,आणि काळजी घ्या!
आयुष्य खुप सुन्दर आहे.

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल..!

आयुष्य छान आहे

आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.
सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन
पडावं लागतं

… तुमचा दिवस छान जाओ…

रामरक्षेची जागा आता Android ने घेतली

रामरक्षेची जागा आता Android ने घेतली,
त्या नादातच आजकालची कार्टी ऊशिरा झोपली….

माहीत नाही सीता कोण,भगवदगीता कोण,
मात्र प्रत्येक हातात Latest आय फोन.

पुस्तकाची PDF झाली,
रोज वेगळा BF
अन रोज नवी GF आली…

प्रगती होतेय सांगत
घडणारी / बिघडणारी
नवीन Online पीढ़ी आली…

अंगठे दुखतायत आता Type करून
मानसं भेटतायतं आता Skype वरुन…

पाहुण्यांना भेटणं,पत्र लीहिणं जुनं झालं आता,
काका,Plzz ज़रा तुमचा Email ID देता…

मॉर्निंग Walk कधीचाच बंद झालाय,
Android Market मध्ये Temple Run जो आलाय…

व्हर्चुअल जमान्यात लांबचे सगळे झाले ‘Connected’,
पण शेजारधर्म ‘Is Totally Disconnected’…

आई वडिलांचे संस्कार सुद्धा Download केले जातील आता,
‘देव देव’ काय करता,पूजा करायचं पण App आलाय आता….

या ‘Technology’ मागे पळता पळता,
लोकांनी पळणंच बंद केलय आता….

विसरले सारे चव आईच्या भाजीची,
शुर गाथा शिवाजीची,
साथ पसरलीय सावध रहा
Latest आलेल्या ‘Technology’ ची. . .

Manatle gupit Manapasun Japave lagte

Manatle gupit Manapasun Japave lagte,
Nkalat alelya ashruna Lapvave lagte,
PREM asach aste,
kadhi ashruna, kadhi bhavnana
Tar kadhi swatalach savrave lagte.

Apulki Asel Tar Jivan

Apulki Asel Tar Jivan Sundar,
Phul Asel Tr BaaG Sundar,

Galatlya-Galat Hasu Aale Tar
Chehra Sundar
Aani
Naati Manapasun Japli Tr Athwani Sundar!…..

image

आयुष्यातील कोणत्याही दिवसावर आक्षेप घेऊ नका

आयुष्यातील कोणत्याही दिवसावर आक्षेप घेऊ नका
चांगला दिवस यश देऊन जातो,
वाईट दिवस अनुभव देऊन जातो,
सर्वात वाईट दिवस चांगली शिकवण देऊन जातो.

Posted from WordPress for Android

Archives

%d bloggers like this: