सर्वांना कळविण्यास आनंद वाटतो की, कोजागिरी निमित्त आमच्या घरी पावभाजी व दुग्धपानाचा कार्यक्रम आज रात्री आयोजित केला आहे..!!!
तरी सगळ्यांना विनंती आहे की, आपण सर्वांनी सहपरिवार….
आप-आपल्या घरी असाच काहीसा कार्यक्रम करून कोजागिरी साजरी करावी…!!
Thousands of SMS, dig here texter,
05 Oct 2017 2 Comments
in Facebook SMS, Kojagiri SMS, Veg SMS, Whats App SMS
Surprise your liver by drinking Milk tonight …. Happy Kojagiri.
05 Oct 2017 Leave a comment
in Facebook SMS, Kojagiri SMS, Veg SMS, Whats App SMS
*कोजागिरी पौर्णिमा*
आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी दूध आटवून केशर, पिस्ता, बदाम वगैरे घालून लक्ष्मीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मी येऊन ((संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे विचारते, म्हणून या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.
आश्विनी पौर्णिमेस हे नाव असून ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हणतात, दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी, पूजेनंतर देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह स्वत:ही सेवन करावेत, असा हया व्रताचा विधी सांगितला आहे. रात्री चंद्रपूजा करून त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी द्यूत खेळावे, असेही सांगितले आहे. या रात्री लक्ष्मी ‘को जागर्ति’ (कोण जागा आहे?) असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृध्द करते. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इ. ठिकाणी असंख्य दीप लावावेत. सनत्कुमार संहितेत हया व्रताची कथा दिली आहे. प्राचीन काळी याच दिवशी ‘कौमुदी महोत्सव’ साजरा करीत. ‘कौमुदी पौर्णिमा’ व शरत्पौर्णिमा’ अशीही नावे हया दिवसास आहेत, पावसाळयानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळेही तिला उत्सवाचे महत्व आले असावे.
कोजागिरी पौर्णिमा (अश्विन पौर्णिमा) हा पावसाळ्यानंतर येणारा आकाश निरभ्र असण्याचा पहिला दिवस होय. या रात्री आकाश स्वच्छ असल्यामुळे चांदणे व पूर्ण चंद्राचा आस्वाद आपल्याला घेता येतो. रात्री श्रीलक्ष्मी व एैरावतावर बसलेल्या राजा इंद्राची पूजा केली जाते. उपोषण (उपवास), पूजन व जागरण या तिन्ही घटकांना या दिवशी सारखे महत्त्व असते. मंदिरे, घरे आदि ठिकाणी अधिकाधिक दिवे लावावेत – जेवढे जास्त दिवे तेवढा मानवाचा अधिक उत्कर्ष – असे या दिनाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे. हा दिवस व ही रात्र प्रामुख्याने श्रीलक्ष्मीच्या आराधनेची असते. पूर्ण असलेल्या चंद्रावरून लक्ष्मी पृथ्वीवर उतरते आणि `कोऽऽजागरति’ `कोऽऽजागरति’ असे विचारते. जो जागा असेल, त्यास लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हटले जाते.
लक्ष्मीला, इंद्राला व चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखविला जातो आणि सर्व मंडळी स्वत:ही दुग्धपानाचा आनंद घेतात. अलीकडे या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक होऊ लागले आहे. चंद्र, चांदणे व दूध यांचा आनंद मित्रमंडळी, कुटूंबीयांसमवेत लोक सार्वजनिक ठिकाणीही घेतात.
कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव, या दिवशी चंद्र स्वत:च्या सोळाही कलांनीफुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. त्या दिवशी नवीन तयार झालेल्या धान्याचे पोहे दुधासोबत खावेत. चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत, म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धवल रंगी उत्सव गणला जातो. या दिवशी नचायचे, बागडायचे, गायचे, रास, गरबा खेळायचा.
या दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची आश्र्विनी करतात. मुलाला अंघोळ घालतात. जेवणात काही तरी गोड पदार्थ करतात. सायंकाळी प्रथम देवाला नंतर चंद्राला औक्षण करुन मुलाला ओवाळतात. विशेषत: महाराष्ट्र्रात हा प्रघात आहे. याला मुलांची आश्र्विनी करणे म्हणतात.
कोजागिरी व्रत
आश्र्विन पौर्णिमा ऐरावतावर आरुढ झालेल्या इंद्राची आणि महालक्ष्मीची पूजा करावी, उपवास करावा. गंध-पुष्पांनी पूजिलेले व तुपाचे किमान शंभर दीप लावून देवमंदिर, तुलसी वृंदावन इत्यादी ठिकाणी ठेवावे. उजाडल्यावर स्नान करुन पूजा करावी. घृतर्शकरामिश्र्रित खिरीचा नैवेद्य दाखवावा, वस्त्रे, दीप दान करावे, असे केल्याने अनंत फलाची प्राप्ती होते, असे म्हटले आहे.*
.
.
.
.
*कोजागिरी पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा*
05 Oct 2017 Leave a comment
in Facebook SMS, Kojagiri SMS, Marathi SMS, Veg SMS, Whats App SMS Tags: कोजागिरी SMS, Kojagiri Marathi SMS, Kojagiri SMS
कोजागिरी…..
चांदणे शिंपीत जावे सुहृदांच्या अंतरी
यास्तवे आयोजिली रम्य ही कोजागिरी…
टाका तुसे, काढून मनीची मोकळी व्हावी मने
भिजल्या पाना फुलांतील कोवळी जैसी उन्हें
साद देता याद यावी अंतरी, दिगंतरी
यास्तवे आयोजिली रम्य ही कोजागिरी..
सळसळो चैतन्य इतुके दैन्यही जेरीस यावे
वादळाने घुसमटोनी मुठीत तुमच्या कैद व्हावे
जीवनाला कैफ यावा उसळत्या दर्या परी
यास्तवे आयोजिली रम्य ही कोजागिरी…!!!
***************
कोजागिरी पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!
15 Oct 2016 Leave a comment
in Facebook SMS, Google SMS, Kojagiri SMS, Marathi SMS, Whats App SMS
*|| ॐ कुलदेवतोभ्यो नम:||*
✨✨ कोजागिरी पौर्णिमा✨✨
*को जागरती = कोण जागं आहे !….*
*अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या व्रतांपैकीच एक अतीशय महत्त्वाचे आणि प्रभावी व्रत कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी-कुबेर-इंद्र-चंद्र आदी देवतांची महत्वाची पूजा.*
15 ऑक्टोंबर शनिवार
पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शु.पोर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पोर्णिमा’ अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात.
त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे.हा उत्सव अश्विन शु. पोर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२ ते १२.३९ या ३९ मिनिटात करायचा असतो. *भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर*यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी असतात त्यांना अमृताचा (दुध) नवैद्य लागतो.
* पूजाविधी मांडणी :-
मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर
१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवावी
२) विड्याच्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.
३) तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा/गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतिक म्हणून घ्यावा.
अशी मांडणी रात्री १२ वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक १२ ते १२:३० या ३० मिनिटात दुधाचे भांडे चंद्राकिरणात ठेवावे. जेणे करून चंद्र देवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.
४) चंद्राचे प्रतिक म्हणून चंदनाचा एक छोटा भरीव गोल बनवावा.
५) १२:३० ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी
*ऋण रोगादी दारिद्रयम अपमृत्यू भय I शोक मनस्ताप नाशयन्तु मम सर्वदा II*
दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपारी जपून ठेवून दरवर्षी पुजाव्यात. कोजागारीस त्यांची पूजा करावी. १२ ते १२:३० या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी
त्यात गायत्री या मंत्राचा १ माळ जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र, प्रत्येक १ माळ जप करावा, तसेच १ वेळा स्त्री सुक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा व गीतेचा १५ वा अध्याय वाचावा.
हा अतिशय महत्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा! लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी हि परमदयाळू आहे. कृपाळू आहे, ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणते, त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.
या मोठ्या बहिणीस *अक्काबाई’ म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की ‘अक्काबाईचा फेरा आला’ हि अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे कोण जागे आहे. ते ती पाहते अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय? *कोजागर्ती*? यावरून या पौर्णिमेला *कोजागरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो *कोजागरती* असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले
🚩 *गुरुदेव दत्त* 🚩
15 Oct 2016 Leave a comment
in Facebook SMS, Kojagiri SMS, Marathi SMS, Veg SMS, Whats App SMS, Whats App Status
मंद प्रकाश हा चंद्राचात्यात गोड स्वाद हा दुधाचा
विश्वास वाढु द्या नात्याचा
त्यात असुदे गोडवा साखरेचा……
कोजागिरी पोर्णिमेचूया हार्दिक शुभेच्छा…:)
08 Oct 2014 Leave a comment
in Celebrations SMS, Kojagiri SMS, Marathi SMS, Veg SMS
चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी ….
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी .
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
07 Oct 2014 Leave a comment
in Celebrations SMS, Kojagiri SMS, Marathi SMS, Veg SMS
मंद प्रकाश हा चंद्राचा
त्यात गोड स्वाद हा दुधाचा
विश्वास वाढुद्या नात्याचा
त्यात असुदे गोडवा साखरेचा….
कोजागिरी च्या हार्दिक शुभेछा
11 Oct 2011 Leave a comment
in Festival SMS, Kojagiri SMS, Marathi SMS, Veg SMS
Chandrachya Sakshine MiLaLi Basundichi Mejwani….
KOJAGIRI Chya Ratrine LihiLi Jagaranachi Kahani.
KOJAGIRI PORNIMECHYA HARDIK SHUBHECHA.
Posted from WordPress for Android