कोजागिरी…..

कोजागिरी…..

चांदणे शिंपीत जावे सुहृदांच्या अंतरी

यास्तवे आयोजिली रम्य ही कोजागिरी…

टाका तुसे, काढून मनीची मोकळी व्हावी मने

भिजल्या पाना फुलांतील कोवळी जैसी उन्हें

साद देता याद यावी अंतरी, दिगंतरी

यास्तवे आयोजिली रम्य ही कोजागिरी..

सळसळो चैतन्य इतुके दैन्यही जेरीस यावे

वादळाने घुसमटोनी मुठीत तुमच्या कैद व्हावे

जीवनाला कैफ यावा उसळत्या दर्या परी

यास्तवे आयोजिली रम्य ही कोजागिरी…!!!

***************

कोजागिरी पौर्णिमेच्या

हार्दिक शुभेच्छा!

Archives

%d bloggers like this: