Tu Aslyawar, Tu Naslyawar

” तु असल्यावर, तु नसल्यावर “

तु असली की, मी माझ्यात नसतो,

तु नसली की, मी हरवून जातो || १ ||

तु असली की, जग सुंदर दिसते,

तु नसली की, जग नुसते दिसते || २ ||

तु असली की, मन हुरळून जाते,

तु नसली की, मन होरपळून जाते || ३ ||

तु असली की, वाटत खूप बोलावं,

तु नसली की, वाटत काय बोलावं || ४ ||

तू असली की, वेळ कसा जातो हे काळात नाही,

तु नसली की, वेळ कमी जातो हे काळात नाही || ५ ||

तु असली की, मी मुद्दाम रस्ता विसरतो,

तु नसली की, मला रस्ता कुठे आठवतो || ६ ||

तु असली की, मी खूप भटकतो,

तु नसली की, मी फक्त भरकटतो || ७ ||

तु असली की, मी मी असतो,

तु नसली की, मी कुणी नसतो || ८ ||

Archives

%d bloggers like this: